धामणगाव बढे (बुलडाणा) - अतिरिक्त कर्ज मंजुरीसाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाºया जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निरीक्षकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुलडाणा जिल्हा बँकेच्या धामणगाव बढे शाखेतील निरीक्षक सुधाकर अजाबराव देशमुख (५२) याने अतिरिक्त कर्ज मंजुरीसाठी मोताळा तालुक्यातील खांडवा येथील एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार आली होती.त्यावरून पोलिसांनी देशमुख यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची दखल घेत आरोपीस निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, यातील दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्यास कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 05:03 IST