शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी ; बँक व्यवस्थापकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:23 IST

नांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला.

ठळक मुद्देसोमवारी धानोरा वि. येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बँक मॅनेजर दिवसे व शिपाई चव्हाण यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी केली.गैरफायदा घेणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची यापुढे शासनाने गय करु नये व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शासन करावे अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला.दाताळा येथील सेंट्रल बँकेचा मॅनेजर दिवसे याने शेतकऱ्यास पीक कर्ज देण्याच्या मोबदल्यात त्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. सदर महिलेच्या तक्रारीवरुन मलकापूर ग्रामीण पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल असून मॅनेजरचा सहकारी शिपायास अटक करण्यात आली आहे. मॅनेजर अद्यापही फरार आहे. बँक मॅनेजरच्या केलेल्या या निंदनीय घटनेचा निषेध राज्यभरात विविध स्तरातून होत असून सोमवारी धानोरा वि. येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बँक मॅनेजर दिवसे व शिपाई चव्हाण यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी केली. व मॅनेजरच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची यापुढे शासनाने गय करु नये व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शासन करावे अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनावर गुलाबराव पाटील, सोपान चोपडे, कैलास पाटील, राजू राखोंडे, रमेश अढाव, सुभाष कोल्हे, दिपक सरोदे, परमेश्वर ठाकरे, संदीप नाफडे, गजानन रास, समाधान वानखडे, मोहन बोंडे, भाऊराव पाटील, भावेश गावंडे, विनायक उंबरकर, एकनाथ चोपडे, विशाल जंगले, महादेव वानखडे यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.   

  राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस निरिक्षकांना निवेदन

मलकापूर : मलकापूर तालुक्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पक्षनेते संतोषराव रायपुरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेतील आरोपींवर  कडक कारवाई करावी तसेच त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली.  पोलीस निरिक्षक  बि.आर.गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर संतोषराव रायपुरे, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, शहराध्यक्ष शाहीद शेख, पं.स.सदस्य सुरेश पाटील, पुरुषोत्तम रायपुरे, बबनराव तायडे, संदीप गायकवाड, सुखदेव चांदेलकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूराMalkapurमलकापूर