शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

By Admin | Updated: March 12, 2017 02:09 IST2017-03-12T02:09:26+5:302017-03-12T02:09:26+5:30

मेहकर येथे शिवसेनेचा रस्तारोको.

Demand for Seven Deficit of Farmers | शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

मेहकर, दि. ११- मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. सतत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, या मागणीसाठी मेहकर येथे शिवसेनेच्या वतीने ११ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकर्‍यांच्या तूर, सोयाबीन, कापूस व इतर पिकांना चांगला भाव मिळावा, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने ११ मार्च रोजी जिजाऊ चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला शेतकर्‍यांना विविध सवलती द्या, कर्जमाफ करा, सातबारा कोरा करा, अशा घोषणा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, बबनराव भोसले, शहरप्रमुख जयचंद बाठीया, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, रमेश बोरे, संतोष चनखोरे, माधव तायडे, मनोज घोडे, रवी रहाटे, रामेश्‍वर भिसे, पिंटू सुर्जन, प्रमोद काळे, रमेश देशमुख, ओम सौभागे, राजू घनवट, गणेश लष्कर, भागवत पिसे पाटील, संदीप तट्टे, हर्षल गायकवाड, तौफीक कुरेशी, देवीदास चनखोरे, प्रल्हाद राजगुरू, विकास जोशीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand for Seven Deficit of Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.