अमडापूर येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:15+5:302021-04-23T04:37:15+5:30
अमरापूर हे चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून, या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २८ खेडे जोडलेली आहेत. सध्या कोरोना ...

अमडापूर येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
अमरापूर हे चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून, या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २८ खेडे जोडलेली आहेत. सध्या कोरोना महामारीचा हाहाकार सुरू आहे. परिसर मोठा असल्याने अमडापूरसारख्या ठिकाणी सेंटर उभारण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. परिसरातून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना चिखली किंवा बुलडाणा या ठिकाणी क्वाॅरंटाईन करण्यात येते. मात्र, तेथे असलेल्या कोविड सेंटरमध्ये दूर असल्या कारणामुळे रुग्ण व नातेवाइकांची फरफट होते. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यात आता कडक लाॅकडॉऊनला सुरुवात झाली आहे. अमडापूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळा इतर काॅलेजेस बंद असल्याने क्वाॅरंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर जागा उपलब्ध आहे. यामुळे या ठिकाणी २८ खेडेगावासह अमडापूर परिसरातील पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना व येथे कोविड सेंटर उभारल्यास सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे रुग्णांना चिखली, बुलडाणा येथे जाण्याची गरज पडणार नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची फरफट थांबेल. यामुळे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अमडापूर येथे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी अमडापूर येथील व परिसरातील कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांच्याकडून मागणी होत आहे. सरपंच वैशाली संजय गवई व ग्रामविकास अधिकार के. के. शेगोकार यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे निवेदन दिले आहे.