देऊळगाव मही येथे काेविड सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:45+5:302021-04-25T04:34:45+5:30
देऊळगाव मही ही ३५-४० खेड्यांची बाजारपेठ असून रुग्णांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी सर्वप्रथम देऊळगाव महीमध्ये यावे लागते़ त्यानंतर देऊळगाव ...

देऊळगाव मही येथे काेविड सेंटर उभारण्याची मागणी
देऊळगाव मही ही ३५-४० खेड्यांची बाजारपेठ असून रुग्णांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी सर्वप्रथम देऊळगाव महीमध्ये यावे लागते़ त्यानंतर देऊळगाव राजा, बुलडाणा, जालना या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते़ काेराेना रुग्ण वाढत असल्याने देऊळगाव राजा, जालना आणि बुलडाणा यासारख्या शहरामध्ये कोरोनाबाधित जास्त प्रमाणात असल्यामुळे बेड मिळत नाही़ त्यातून परिसरातील कोरोनाबाधितांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ काहींना हाेम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ मात्र, प्रत्येकाच्या घरी हाेम क्वारंटाईन राहण्यासाठी व्यवस्था नसते़ त्यामुळे तो रुग्ण त्याच कुटुंबात राहतो आणि कुटुंबाबरोबर आजूबाजूच्या लोकांनाही बाधित करताना दिसत आहे़ परिसरातील खैरव सरंबा, नागनगाव या गावामध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे़ भौगोलिकदृष्ट्या देऊळगाव मही हे गाव परिसरात उपचाराच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर आहे़ देऊळगाव मही ग्रामपंचायतच्या अंतर्गत सहकार विद्या मंदिरच्या इमारतीचा वापर करून त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करून कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोयीस्कर हाेणार आहे़ त्यामुळे गावात काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंगणे व प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंगणे यांनी केली़ यावेळी मोहम्मद कलीम मोहम्मद हसम, उद्धव बनसोडे, गणेश बनसोडे, आकाश गवते इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते़