तलाठ्यांची बदली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST2021-07-14T04:39:54+5:302021-07-14T04:39:54+5:30
सिंदखेड राजा, देऊळगाव राजा उपविभागात अनेक तलाठी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार ...

तलाठ्यांची बदली करण्याची मागणी
सिंदखेड राजा, देऊळगाव राजा उपविभागात अनेक तलाठी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार त्यांच्या बदल्या ठरावीक काळानंतर होणे गरजेचे असताना अनेक तलाठी नियमबाह्यरित्या एकाच तालुक्यात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांशी त्यांचे हितसंबंध वाढल्याने चुकीच्या नोंदी घेणे, नियमबाह्य पद्धतीने फेरफार घेणे असे गैरप्रकार वाढले आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून चुकीच्या नोंदीमुळे अनेकांना न्यायालयात जावे लागत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागातील दोन्ही तालुक्यांत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या तलाठ्यांची चौकशी करून नियमानुसार तत्काळ त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करावेत. अन्यथा रिपाई डेमोक्रेटिकतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.