चिखली मुख्य मार्गावरील अनधिकृत फलक काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST2021-06-26T04:24:20+5:302021-06-26T04:24:20+5:30
ते चिखली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र हरलालका, अग्रवाल समाजाचे सचिव ब्रिजमोहन चौधरी उपस्थित ...

चिखली मुख्य मार्गावरील अनधिकृत फलक काढण्याची मागणी
ते चिखली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र हरलालका, अग्रवाल समाजाचे सचिव ब्रिजमोहन चौधरी उपस्थित होते. बाबूलाल चौक ते बसस्थानक या मार्गाला नगर परिषदेने ठराव घेऊन महाराजा अग्रसेन मार्ग म्हणून नामकरण करण्यात आले होते. त्याचे नूतनीकरण २०१५ ला करण्यात येऊन, या मार्गावर समाजाच्या वतीने चार लक्ष रुपये खर्च करून स्वागत कमान उभारण्यात आली आहे. परंतु काही दिवसापूर्वी या स्वागत कमानीवर अवैधरीत्या महाराणा प्रताप मार्केटचा डिजिटल फलक लावण्यात आला आहे. नगरपालिकेच्या ठरावानुसार या मार्गाला महाराजा अग्रसेन मार्गाचे नामकरण केलेले असून, ते कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी रवींद्र हरलालका यांनी याप्रसंगी केली. याविषयी चिखली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.