सदाेष मतदार याद्यांची चाैकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST2021-01-25T04:35:20+5:302021-01-25T04:35:20+5:30

घेण्यात यावी, अशी मागणी वसीम अहेमद हसन, शेरखाँ व शेख वसीम शेख यासीन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे २२ जानेवारी ...

Demand for regular voter lists | सदाेष मतदार याद्यांची चाैकशी करण्याची मागणी

सदाेष मतदार याद्यांची चाैकशी करण्याची मागणी

घेण्यात यावी, अशी मागणी वसीम अहेमद हसन, शेरखाँ व शेख वसीम शेख यासीन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे २२ जानेवारी राेजी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डाेणगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये मतदार यादीत एकच व्यक्ती किंवा मतदारांची नावे तीन तीन ठिकाणी एकाच नावाने नोंदलेली आहेत. सदोष व चुकीच्या मतदारांच्या नावाची नाेंद अनेक ठिकाणी असल्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक पारदर्शक व नियमानुसार झालेली नाही तसेच सर्व मतदारांना व जनतेला नवीन वाॅर्डनिर्मिती झाल्याबाबत अथवा गावातील मोहल्लामधून वाॅर्डाची पुनर्रचना झाल्याबाबत पूर्ण माहिती दिलेली नाही. झालेली नवीन निवडणूक सदोष झाली आहे. झालेल्या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक १ ते ६ मधील मतदार यादीत एकाच व्यक्तीची नावाची नोंद अनेक वाॅर्डात आहे. वाॅर्ड ४ व ६ मधील मतदारांची यादी सदोष आहे. त्यामुळे डोणगाव ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करावी तसेच सदाेष मतदार यादी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Demand for regular voter lists