उंद्री येथे गतिरोधक बसवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:07+5:302021-08-26T04:37:07+5:30
अमडापूर : जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर उद्री गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावासह राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुका ...

उंद्री येथे गतिरोधक बसवण्याची मागणी
अमडापूर : जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर उद्री गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावासह राष्ट्रवादी काँग्रेस (अल्पसंख्याक विभाग) चिखली तालुका अध्यक्ष रफिक शेख यांनी केली आहे़
उंद्री गावातून जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्ग आहे़ या मार्गावर भरधाव वेगाने वाहनांची वाहतूक सुरू असत़े गावात हा मार्ग चाैपदरीकरणाचे नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागताे़ गावात रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे भरधाव जाणाऱ्या वाहनांचे अपघात घडले आहेत़ यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत़ या मार्गावर पाच शाळा असून, मंदिर ,ईदगाह,हिंदू समशानभूमी,मुस्लिम कब्रस्थान सुद्धा ह्याच मार्गावर आहेत़ त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते़ त्यामुळे किसनदेव मंदिर समोर,बबन उपाध्येयांच्या दुकानासमोर,मराठी जि .प. शाळेसमोर, मोठ्या पुलाजवळ,शेख रशीद भंगारवाले यांच्या दुकानासमोर,शहाजी हायस्कूल समोर,श्री शिवाजी हायस्कूल समोर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतच्या ठरावासह करण्यात आली आहे़ निवेदनावर रफिक शेख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तथा ग्रामपंचायत सदस्य उंद्री ,राजीक खान चिखली तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़