शहरांचा पोकरा योजनेत समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:18+5:302021-09-23T04:39:18+5:30

सिंदखेड राजा : शहराचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) समावेश करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर ...

Demand for inclusion of cities in Pokra scheme | शहरांचा पोकरा योजनेत समावेश करण्याची मागणी

शहरांचा पोकरा योजनेत समावेश करण्याची मागणी

सिंदखेड राजा : शहराचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) समावेश करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात डॉ. खेडेकर यांच्यासह शहराचे नगराध्यक्ष सतीष तायडे, सभापती राजेंद्र आढाव, नगरसेवक बाळू म्हस्के यांनी मंत्रालयात मंत्री भुसे यांची भेट घेतली असून, त्यांना निवेदन सुपूर्द केले. पालिका मुख्यालय असले तरीही येथील नव्वद टक्के नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शहराचे शेती क्षेत्र ३ हजार ९४१ हेक्टर असून, तीन हजारांपेक्षा जास्त खातेदार आहेत. त्यामुळे शहराचा पोकरा योजनेत समावेश करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही योजना शहरातील शेतकऱ्यांसाठी राबविता आल्यास येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. शहर असले तरीही ग्रामीण बाज असल्याने आणि येथील व्यवसाय व आर्थिक उलाढाल शेतीवर अवलंबून असल्याने पोकरा योजना येथे मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for inclusion of cities in Pokra scheme