मोबाईलवरून बदनामी, सात जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: October 21, 2014 23:54 IST2014-10-21T23:54:43+5:302014-10-21T23:54:43+5:30
खामगाव येथील घटना.

मोबाईलवरून बदनामी, सात जणांविरुद्ध गुन्हा
खामगाव (बुलडाणा): पंधरा वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड करून विनयभंग करणार्यास सात जणांनी गैरकायदा मंडळी जमवून मारहाण केली. या मारहाणीची चित्रफीत काढून व्हॉट्स अँपवर टाकल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाने पस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, ९ सप्टेंबर रोजी सकाळी एका विद्यालयातील पंधरा वर्षीय विद्यार्थिनीला त्याच विद्यालयातील विद्यार्थी माजीद खान म. साजीद खान याने मधल्या सुटी त शाळेच्या मागे भेट. नाही आली तर तुला बांधून मारेल अशी धमकी देऊन त्या विद्यािर्थनीचा हात धरून विनयभंग केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी माजीद खान म. साजीद खान (वय १९) रा. जिया कॉलनी खामगाव याच्याविरुद्ध कलम ३५४ ड, ५0६ भादंवि व सहकलम १२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, माजीद खान म. साजीद खान (वय १९) याला मारहाण केल्याची चित्रफीत मोबाईलवर टाकून बदनामी केली. याप्रकरणी माजीद खान याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संकल्प मोरे, जग्या, गोंड्या, रोशन लोखंडे, सनी, चेतन सारसर, रोशन लोखंडेचा भाऊ सर्व रा. खामगाव यांच्याविरुद्ध कलम ३२४, १४७, १४८ भादंविसह कलम ६६ आयटी नुसार गुन्हा दाखल केला आहे.