धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा
By Admin | Updated: April 20, 2017 23:41 IST2017-04-20T23:41:22+5:302017-04-20T23:41:22+5:30
मलकापूर- धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी दिनेश हेमराज लोढाया यांना कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा व पाच लाख रूपये दंड ठोठावला.

धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा
मलकापूर : वासुदेव कुंजीलाल मुंधडा, रा. मलकापूर यांच्याकडून दिनेश हेमराज लोढाया, रा.मलकापूर याने पाच लाख रुपये उसनवार घेतले होते. ही रक्कम परत करण्यापोटी त्याने त्याच्या दिनेश एंटरप्रायजेस या फर्मचा धनादेश (चेक) वासुदेव कुंजीलाल मुंधडा यांना दिला होता.
हा चेक अनादरित झाल्यामुळे वासुदेव मुंधडा यांनी मलकापूर येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट, मलकापूर यांच्या न्यायालयात फौ.मु.नं.२८५/१५ अन्वये प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणात न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. यादव यांनी २० एप्रिल रोजी आरोपी दिनेश हेमराज लोढाया यास चेक अनादरप्रकरणी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा, असा निकाल सुनावला आहे. फिर्यादी पक्षातर्फे अॅड.आर.व्ही. पाटील व अॅड.जी.डी. पाटील यांनी काम पाहिले.