चिखलीत रुग्णवाहिकेचे लाेकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST2021-06-02T04:26:14+5:302021-06-02T04:26:14+5:30

लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट चिखली व परिसरातील रूग्णांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय सहायता उपकरण केंद्र हा उपक्रम सुरू ...

Dedication of ambulance in mud | चिखलीत रुग्णवाहिकेचे लाेकार्पण

चिखलीत रुग्णवाहिकेचे लाेकार्पण

लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट चिखली व परिसरातील रूग्णांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय सहायता उपकरण केंद्र हा उपक्रम सुरू करत आहे. यामध्ये रूग्णांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे उदा. विविध बेल्ट, नी कॅप, अ‍ॅब्ज व्रॅप इ. साहित्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. यासह परिसरातील रूग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी ट्रस्टच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण होत आहे. हे कर्तव्य आम्ही देशासाठी, आपल्या बांधवांसाठी एक छोटेसे योगदान देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे असे आम्हाला वाटते. या सुविधांचा वापर करून आम्हाला सेवेची संधी देणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे जाहीर आभार तसेच या सुविधांचा अधिकाधिक गरजूंना लाभ व्हावा आणि नररूपी नारायणाची सेवा करण्याची वारंवार संधी मिळावी ही अपेक्षा लक्ष्मीनारायण ट्रस्टचे राजेश चांडक यांनी व्यक्त केला़

Web Title: Dedication of ambulance in mud