पशुधनाचे घटते प्रमाण चिंताजनक !
By Admin | Updated: May 26, 2015 02:23 IST2015-05-26T02:23:36+5:302015-05-26T02:23:36+5:30
सात वर्षात गायी, म्हशीच्या संख्येत घट.

पशुधनाचे घटते प्रमाण चिंताजनक !
बुलडाणा : पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा पूरक रोजगार मानला जातो. एकेकाळी राज्यात पशुधनाचे प्रमाण सर्वाधिक होते; मात्र गेल्या २00७ या वर्षानंतर हे प्रमाण ९.७ टक्क्यांपर्यंंंत खाली घसरले आहे. विदर्भात हे प्रमाण जास्त असून, घटणारे पशुधन चिंतेची बाब ठरत आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय हे कृषीसंलग्न उपक्रम असून, रोजगार मानले जातात. हे व्यवसाय शेती उत्पन्न वाढीस पूरक ठरतात. राज्यात चौदाव्या पशुधन गणनेनुसार १९९२ मध्ये दर लाख लोकसंख्येमागे पशुधन हे ४६ हजार होते. पुढे सोळाव्या गणनेत १९९७ मध्ये हे प्रमाण ५0 हजार पर्यंंंत वाढले होते; मात्र पुढे हेच प्रमाण सतराव्या पशुधन गणनेत खालावून ३६ हजार झाले. अठराव्या पशुधन गणनेनुसार २00७ मध्ये राज्यात एकूण सुमारे ३६0 लाख पशुधन होते, ते दर लाख लोकसंख्येमागे हे पशुधन ३७ हजार असल्याचे आढळून आले. २0१२ मध्ये झालेल्या एकोणिसाव्या पशुधन गणनेनुसार राज्यात सुमारे ३२५ लाख पशुधन असून, २0१२ या वर्षात हे प्रमाण २00७ च्या पशुगणनेपेक्षा ९.७ टक्के कमी होते.