कापसाचे भाव सहा हजार रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:33 PM2021-02-14T12:33:57+5:302021-02-14T12:34:03+5:30

Cotton Price दोन दिवसांपूर्वी कापसाचे दर ६ हजार ५० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत

Decline in cotton production, price at Rs 6,000 | कापसाचे भाव सहा हजार रुपयांवर

कापसाचे भाव सहा हजार रुपयांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : दोन दिवसांपूर्वी कापसाचे दर ६ हजार ५० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत. पुरवठा आणि मागणी यामध्ये अशीच तफावत राहिल्यास कापसाचे दर आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे.
यावर्षी खामगाव तालुक्यातील घाटपुरी, वाडी, पळशी बु., पिंपळगाव राजा, आवार यासह अन्य गावांमध्ये परतीचा पाऊस जोरदार झाला. त्यामुळे बोंडसड झाल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीचा पाऊस संततधार झाल्याने कपाशीची बोंडे सडली. परिणामी उत्पादनात २५ टक्के घट आली. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. बोंडसडनंतर बोंडअळीनेही कपाशीचे मोठे  नुकसान झाले. यामुळे पाहिजे तसे कापसाचे उत्पादन जिल्ह्यामध्ये झाले नाही. 

उत्पादनात घट 
यावर्षी बोंडसड व बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांना फरदडीचा कापूस न घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे फरदडीचा कापूस अनेक शेतकरी घेत नाही आहेत. परिणामी उत्पादनात घट आली आहे.  खासगी व्यापाऱ्यांकडे ही कापसाची आवक कमालीची मंदावली आहे. शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने ही आवक मंदावल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Decline in cotton production, price at Rs 6,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.