कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:01 PM2020-01-31T14:01:14+5:302020-01-31T14:01:21+5:30

या कर्जमुक्ती योजनेमध्ये पीक कर्जाव्यतीरिक्त शेतीसंलग्न अन्य कर्ज माफ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Debt relief confused farmers | कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम!

कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम!

Next

- ब्रह्मानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये केवळ पीक कर्जाचा समावेश असून शेतीसंलग्न कर्जाचा यात समावेश नाही. मात्र शेतकरी कर्जमुक्तीमध्ये शेतीसंलग्न कर्जाचाही समावेश असल्याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बँकामध्ये जाऊन चौकशी करत आहेत. यातून बँक व्यवस्थापन आणि शेतकºयांमध्ये काही वादाचेही प्रसंग जिल्ह्यात उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कर्जमाफी’ ऐवजी ‘कर्जमुक्ती’ असा शब्द प्रयोग आघाडी सरकारने योजनेच्या नावात केलेला आहे. त्यानुषंगाने प्रत्यक्ष शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीसंलग्न कर्जाच्या संदर्भातही भूमिका घेणे गरजेचे ठरत आहे. गेल्या काही वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. शेतीतील उत्पादनात झालेली घट पाहता, शेतकºयांना कर्जफेड करणे अशक्य झाले. परिणामी शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढत गेला. कर्जदार शेतकºयांना आधार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडी सरकारने १ एप्रिल २०१५ पासून ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले २ लाख रुपये पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात या योजनेची कामे सुरू झाली आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात २ लाख ९४० लाभार्थी शेतकºयांना १४०० कोटी रुपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा होणार आहेत. यामुळे शेतकºयांवरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरणार असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेतेमंडळी सध्या प्रत्येक भाषणात आवर्जून सांगत आहेत. परंतू या कर्जमुक्ती योजनेमध्ये केवळ पीक कर्जदार शेतकरीच पात्र ठरत आहेत. शेतकºयांवर पीक कर्जाबरोबरच विहिर, शेतजमीनी सपाटीकरण, हरितगृह, शेडनेट, पाईपलाईन यासारख्या शेतीसंलग्न कामाचेही बँकाचे कर्ज आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी बँकांकडून मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे शेती कर्ज घेतलेले आहे. परंतू या कर्जमुक्ती योजनेमध्ये पीक कर्जाव्यतीरिक्त शेतीसंलग्न अन्य कर्ज माफ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पीक कर्जाबरोबरच शेतीसंलग्न कर्ज माफ झाल्यास शेतकरी खºया अर्थाने कर्जमुक्त होईल, अशा प्रतिक्रिया काही शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलून दाखवल्या. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

बँक स्तरावर माहिती अपडेट करणे सुरू
 कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने सध्या बँक स्तरावर १ ते २८ नमुना असलेला फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. हे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. १ फेब्रुवारीपासून कर्जमुक्ती योजनेतील शेतकºयांची माहिती संबंधीत पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

Web Title: Debt relief confused farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.