मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: August 4, 2016 01:05 IST2016-08-04T01:05:36+5:302016-08-04T01:05:36+5:30

मन प्रकल्पात मासेमारी करताना झाला बुडून मृत्यू.

Death of a young man who went for fishing | मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

खामगाव (जि. बुलडाणा), दि. ३ : तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.
जयरामगड ता. खामगाव येथील अंकुश आत्माराम जाधव (वय २५), सुनील ठक, प्रवीण राठोड व प्रवीण अढाव असे चौघे बुधवारी सकाळी मासेमारीसाठी शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात गेले होते. दरम्यान, मासेमारी करीत असताना यातील अंकुश जाधव या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी धावून आले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. पोलीस व नागरिकांच्या मदतीने अंकुशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने जयरामगड गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of a young man who went for fishing