उष्माघाताने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 23, 2016 01:37 IST2016-05-23T01:37:02+5:302016-05-23T01:37:02+5:30

मेहकर तालुक्यातील घटना.

The death of the woman with heatstroke | उष्माघाताने महिलेचा मृत्यू

उष्माघाताने महिलेचा मृत्यू

मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील अकोला ठाकरे येथील एका ५४ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना २0 मे रोजी घडली आहे. अकोला ठाकरे येथे पाणीटंचाई असल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. २0 मे रोजी दुपारच्या वेळेस अकोला ठाकरे येथे पाण्याचे टँकर आले असता येथील कमल माणिकराव ठाकरे (५४) या महिलेने भर उन्हात पाणी भरले. दरम्यान, पाणी भरतानाच या महिलेला चक्कर आली असता रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. कमल ठाकरे यांच्या पश्‍चात एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.

Web Title: The death of the woman with heatstroke