कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: April 20, 2017 23:34 IST2017-04-20T23:34:59+5:302017-04-20T23:34:59+5:30

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या सावंगी माळी येथील २७ वर्षीय महिलेचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Death of a woman by biting a dog | कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू

कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या सावंगी माळी येथील २७ वर्षीय महिलेचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सावंगी माळी येथील सविता महादू अवचार या महिलेला तीन वर्षांपूर्वी कुत्रा चावला होता. त्यावेळी खासगी औषध घेऊन उपाय केला; परंतु तब्बल तीन वर्षांनंतर कुत्रा चावल्याने विष तिच्या अंगात भिनले. प्रथम साखरखेर्डा येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. पण, निदान झाले नाही. मेहकर येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी कुत्रा चावला होता का? असा प्रश्न नातेवाईकांना केला असता तीन वर्षांपूर्वी चावला होता. त्यावर खासगी इलाज करण्यात आल्याचा दुजोरा नातेवाईकांनी दिला.
संपूर्ण शरीरात विष पसरल्याने उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a woman by biting a dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.