रॉकेल टाकून पेटवून घेतल्याने महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: June 4, 2016 02:40 IST2016-06-04T02:40:56+5:302016-06-04T02:40:56+5:30
वेडसरपणाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. मोताळा तालुक्यातील घटना.

रॉकेल टाकून पेटवून घेतल्याने महिलेचा मृत्यू
मोताळा (जि. बुलडाणा): वेडसरपणाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ९.३0 वाजता तालखेड येथे घडली. याप्रकरणी बोरखेडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविता शिवलालसिंह परमार (५७) ही महिला मागील २0 वर्षांपासून मनोरुग्ण अवस्थेत जगत होती. शुक्रवारी सकाळी घराच्या गच्चीवर तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. महिलेच्या पश्चात पती, दोन मुले व एक सून असा आप्त परिवार आहे. केवलसिंह परमार यांच्या फिर्यादीवरू न आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली.