बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी १०६ जणांनी काेराेनावर मात केली़. तसेच ५५ जणांना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा ०२, मलकापूर तालुका ० १, सिं.राजा तालुका : ०३, संग्रामपूर तालुका ०१, दे. राजा तालुका १०, खामगांव तालुका ०९, चिखली तालुका ०७, शेगांव शहर ३, शेगांव तालुका मनसगांव ३, गोळेगांव १, जानोरी १, पलोदी १, भोनगांव १, पळशी १, मेहकर तालुका : खामखेड १, जळगांव जामोद शहर १, जळगांव जामोद तालुका सुनगांव १, लोणार शहर २, लोणार तालुका येवती १, आरडव १ व इतर जिल्ह्यांतील चार रुग्णांचा समावेश आहे. काेराेना रुग्णांची संख्या घटली आहे.
दाेघांचा मृत्यू; १०६ जणांची काेराेनावर मात, ५५ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:21 IST