ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 24, 2017 05:37 IST2017-06-24T05:37:15+5:302017-06-24T05:37:15+5:30
पार्डा दराडे फाट्यावरील दुर्घटना.

ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: तालुक्यातील चिंचोली सांगळेजवळ पार्डा दराडे फाट्यावरील शेतात मशागतीचे काम आटोपून घरी येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
चिंचोली सांगळे येथील बालाजी हिंमत जाधव (वय २८ वर्ष), गोपाल माणिक जाधव (वय २५ वर्ष) हे दोघे ट्रॅक्टर क्र. एम.एच. २८ टी ७९६४ पार्डा दराडे फाट्यावरील शेतात मशागतीचे काम आटोपून शुक्रवारी दुपारी घरी येण्याकरिता निघाले असता ट्रॅक्टर उलटला. यामध्ये बालाजी हिंमत जाधव ट्रॅक्टरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गोपाल माणिक जाधव यांच्या डोक्याला इजा झाल्याने व कानातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना तत्काळ १0८ रुग्णवाहिकेने मेहकर येथे हलविण्यात आले. ट्रॅक्टरचालक भागवत पंढरी सांगळे यालाही पायाला मार लागला आहे. वृत्त लिहिपर्यंंंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.