अज्ञात तापाने विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 29, 2014 23:57 IST2014-09-29T23:43:30+5:302014-09-29T23:57:35+5:30
साखरखेर्डा परिसरात एका महिन्यात तीन जणांचा मृत्यू.

अज्ञात तापाने विद्यार्थ्याचा मृत्यू
सिंदखेडराजा (बुलडाणा) : साखरखेर्डा परिसरात डेंग्यू सदृश्य तापाने थैमान घातले असून,एका महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज दि.२९ सप्टेबर रोजी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
अज्ञात तापाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव रोशन खिल्लारे (१४) असून तो जिजामाता विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
माहितीनुसार रोशन हा शनिवारला नेहमीप्रमाणे शाळेत आला, मतदान रॅलीत सहभागीही झाला. त्यानंतर त्याला ताप आल्याने तात्काळ खासगी रुग्णालयात तपासणीकरीता नेण्यात आले. परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला बुलडाणा येथे उपचारार्थ हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याअगोदर साखरखेर्डा येथील चंद्रकां त जैन यांचाही औरंगाबाद येथे उपचारादरम्यान डेंग्यू सदृश्य तापेने मृत्यू झाला होता. तर पांग्री काटे येथील दगडूबा वानखेडे यांचा २६ सप्टेंबरला तापेने मृत्यू झाला. किनगावराजा, सिंदखेडराजा येथेही अज्ञात तापाने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात संपूर्ण तालुक्यात या आजाराने थैमान घातले असतांना आरोग्य विभाग मात्र गाढ झोपेत आहे.