डोंगरखंडाळा येथील सैनिकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2017 00:26 IST2017-06-15T00:26:37+5:302017-06-15T00:26:37+5:30
बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सैनिक नायक सुभेदार गजानन शंकर कोगदे यांचा दिल्ली येथे १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

डोंगरखंडाळा येथील सैनिकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सैनिक नायक सुभेदार गजानन शंकर कोगदे यांचा दिल्ली येथे १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर १४ जून रोजी संध्याकाळी डोंगरखंडाळा येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील गजानन शंकर कोगदे यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले होते. त्यानंतर ते १९९५ मध्ये सैन्यमध्ये भरती झाले. त्यांची नियुक्ती आग्रा विभागात करण्यात आली होती. दरम्यान, आजारी असल्यामुळे त्यांना उपचारार्थ दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा १३ जून रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच भाऊ संजय कोगदे, असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर डोंगरखंडाळा येथे उशिरा संध्याकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले.