विजेचा धक्का लागून कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST2017-09-30T00:20:35+5:302017-09-30T00:20:45+5:30
खामगाव : कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश अत्तरकार (वय ३२) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना वाडी ये थे शुक्रवारी दुपारी घडली.

विजेचा धक्का लागून कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश अत्तरकार (वय ३२) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना वाडी ये थे शुक्रवारी दुपारी घडली.
नीलेश रमेश अत्तरकार हे जलंब येथील मूळ रहिवासी असून, स् थानिक एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. तसेच ते कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी वाडी येथे नव्याने बांधलेल्या घराचा शनिवारी वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी २.३0 वाजताच्या दरम्यान घराच्या छतावर चढून पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना दोन तासांपर्यंंत कोणालाही समजली नाही. नीलेश यांचा भाऊ त्यांना बोलावण्यासाठी छ तावर गेला असता सदर घटना निदर्शनास आली.