रेतीच्या ढिगा-याखाली दबून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 26, 2014 23:58 IST2014-10-26T23:53:53+5:302014-10-26T23:58:14+5:30
नांदुरा तालुक्यातील घटना, रेती उत्खनणासाठी गेलेल्या युवकाचा करूणअंत.

रेतीच्या ढिगा-याखाली दबून एकाचा मृत्यू
नांदुरा (बुलडाणा): रेतीच्या ढिगार्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना २३ ऑ क्टोबरच्या सकाळी ७ वाजता ज्ञानगंगा नदीपात्रात घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्या त र्मग दाखल करण्यात आला आहे. याबाबत शे. अब्दुल शे. करामत (२८ रा.गैबीनगर, नांदुरा) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाज ता त्यांचा मोठा भाऊ शे. किस्मत शे. करामत (वय ३२) हा रेती भरण्यासाठी ज्ञानगंगा नदी पात्रात गेला होता. त्यावेळी रेतीची दरड अंगावर कोसळली. त्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून नांदुरा शहर व परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध रेती वाह तूक सुरू आहे. शासनाने रेतीच्या उत्खननासाठी घालून दिेलेले सर्व नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात खड्डे करुन वारेमाप रेती ओरपून नेली जात आहे. संबंधित अधिकारी रेती माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासून असल्याने याकडे दुर्लक्ष करीत आहे त. अधिकार्यांच्या या धोरणामुळे मात्र गरीब निरपराधांचा बळी जात आहे.