स्वाइन फ्लूूमुळे एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2017 05:39 IST2017-06-24T05:39:29+5:302017-06-24T05:39:29+5:30

बिरसिंगपूर येथील एका इसमाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.

Death of one due to swine flu | स्वाइन फ्लूूमुळे एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूूमुळे एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बिरसिंगपूर येथील एका इसमाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.
बिरसिंगपूर येथील भास्कर बळीराम बोराडे (वय ४५) यांना संशयित तापामुळे बुलडाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते; मात्र ताप कमी न झाल्यामुळे त्यांना अत्यावस्थेत औरंगाबाद येथे १९ जून रोजी भरती करण्यात आले. यावेळी वैद्यकीय पथकाने त्यांच्या विविध चाचण्या केल्या. त्यात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळून आले. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलविण्याचा निर्णय दिला; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Death of one due to swine flu