नदीच्या डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 14, 2023 16:58 IST2023-09-14T16:57:24+5:302023-09-14T16:58:19+5:30
पोळा सणाला सुलतानपूर गावागावर शोककळा पसरली.

नदीच्या डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
सुलतानपूर : नदीच्या डोहात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सुलतानपूर शिवारात १४ सप्टेंबरला उघडकीस आली. पोळा सणाला सुलतानपूर गावागावर शोककळा पसरली.
येथील अदित्य कैलास अवचार (वय १४) हा १३ सप्टेंबर रोजी घरी न आल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी गावालगतच्या सिता न्हानी नदीच्या एका डोहाजवळ त्याचे कपडे दिसून आले. येथील शे. तबारक, साहेबराव शिंदे व कैलास ढवळे या युवकांनी डोहात उतरून शोध घेतला असता अदित्यचा मृतदेह सापडला.
दरम्यान, मृतकाचा चुलत काका परमेश्वर आनंदा अवचार यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशनला आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट जमादार लक्ष्मण कटक व त्यांचे सहकारी करीत आहेत.