शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्यामल नगरातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू, नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंत्यविधीची प्रकीया थांबविली

By अनिल गवई | Updated: August 24, 2023 16:05 IST

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

खामगाव: येथील श्यामल नगरातील एका ४५ वर्षीय महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. यामृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करीत नातेवाईकांनी अंत्यविधीची प्रक्रीया थांबविली. त्यामुळे श्यामल नगरात एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, श्यामल नगरातील पूजा देविदास धोटे या महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरकडील मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त करीत अंत्यविधीची प्रक्रीया थांबविली. अंत्यविधीची क्रीया थांबविण्यात आल्याने श्यामल नगरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत्यूचे कारण निष्पन्न करण्यासाठी मृतक महिलेच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. तेथे सायंकाळी महिलेच्या पार्थीवावर शवविच्छेदन करण्यात आले. आता शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या महिलेच्या मृत्यूच्या कारणाचा तिढा सुटणार असल्याची माहिती आहे.

महिलेच्या पतीशी नातेवाईकांचा वाद मृत्यूची माहिती समजताच महिलेचे नातेवाईक श्यामल नगरात धडकले. यावेळी मृत्यूच्या कारणाबाबत संशय बळावल्याने, महिलेच्या भावांच्या मुलांसह काही नातेवाईकांनी तिच्या पतीसोबत वाद घातला. पोलीसांनी मध्यस्ती करीत प्रकरण निस्तरले. त्यामुळे नातेवाईकांना रोष शांत झाला.

खामगाव पोलीस घटनास्थळीमहिलेच्या मृत्यूवरून तणाव निर्माण झाल्याचे समजताच शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी मृतक महिलेच्या नातेवाईकांशी चर्चा करीत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेचे पार्थीव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. महिलेच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस