छतावरून पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 02:22 IST2017-06-11T02:22:48+5:302017-06-11T02:22:48+5:30
एसटी वर्कशॉपच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना मजुराचा पाय घसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना

छतावरून पडून मजुराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील एसटी वर्कशॉपच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना एका मजुराचा पाय घसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना १0 जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली.
एसटी वर्कशॉपवरील टिनपत्रे बदलण्याचे टेंडर अमरावती येथील ठेकेदाराचे असल्याने मजूर वर्ग अमरावती जिल्ह्यातीलच आणल्या गेले होते. आज सकाळी टिनपत्रे बदलण्यासाठी पंजाबराव वानखेडे (वय ५१) रा. अमरावती हा मजूर टिनपत्रे बदलण्याचे काम करत असताना मजुराचा छतावरून पाय घसरल्याने तो खाली पडला. ७0 फुटांवरून खाली पडल्याने सदर मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.
वास्तविक नियमानुसार सेफ्टी बेल्ट लावून काम करायचे होते; मात्र ठेकेदाराने मजुरांसाठी कुठलीही सुरक्षितता न दिल्याने मजुराचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी ठेकेदारावर खुनाचा गुन्हा दाखल करून मजूर कुटुंबास ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राणा चंदन यांनी केली आहे.