वाहनाखाली आल्याने शेतक-याचा मृत्यू
By Admin | Updated: March 18, 2017 01:06 IST2017-03-18T01:06:28+5:302017-03-18T01:06:28+5:30
खामगाव येथे तुरीचे पोते घेऊन जाणारे मालवाहू वाहन उलटल्यामुळे झाला अपघात.

वाहनाखाली आल्याने शेतक-याचा मृत्यू
अमडापूर (जि. बुलडाणा), दि. १७- येथून जवळच असलेल्या नायगाव बु. गावातून खामगाव येथे तुरीचे पोते घेऊन जाणार मालवाहू वाहन अचानक उलटला. यामुळे वाहनातील तुरीच्या पोत्याखाली दबून एका शेतकर्यांचा मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजेला चारोपांग्रा येथील शुभम अण्णा साळवे हा एम.एच.0४ ई वाय २७५४ क्रमांकाचे पिकअप मालवाहक वाहनातून तुरीचे पोते घेऊन लव्हाळा मार्गे खामगावकडे जात होता. अचानक गाडीवरील ताबा सुटून सदर वाहन पलटी झाली. यामुळे वाहकमध्ये बसलेले शेतकरी नवृत्ती तुकाराम इंगळे (वय ६५) रा.चोरपांग्रा हे खाली पडले. त्यांच्या अंगावर तुरीचे पोते पडल्याने पोत्याखाली दबून जागीच मृत्यू झाला.
या आशयाची तक्रार पंढरी रोडूजी डहाके रा.चोरपांग्रा याने अमडापूर पोलिसात दिली. या आधारे वाहनचालक शुभम अण्णा साळवे चालक याचे विरुध्द कलम २७0, ३३७, ३0४ (अ) ४२७ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानदेव ठाकरे हे करीत आहे.