बैलगाडी अपघातात शेतक-याचा मृत्यू

By Admin | Updated: June 25, 2016 00:51 IST2016-06-25T00:51:56+5:302016-06-25T00:51:56+5:30

बैल सुसाट पळाल्याने शेतक-याचे पाय बैलगाडीमध्ये अडकून घडला अपघात.

The death of the farmer in a bullock cart | बैलगाडी अपघातात शेतक-याचा मृत्यू

बैलगाडी अपघातात शेतक-याचा मृत्यू

पहुरजिरा (जि. बुलडाणा): येथील एका ५५ वर्षीय शेतकर्‍याचा बैलगाडीने अपघात झाल्याची घटना १४ जून रोजी घडली होती. गंभीर जखमी झालेल्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला आहे.
येथील विनायक त्र्यंबक गावंडे वय (५५) हे १४ जून रोजी दुपारच्या सुमारास बैलगाडी घेवून शेतात जात होते. दरम्यान बैल सुसाट पळाल्याने शेतकर्‍याचे पाय बैलगाडीमध्ये अडकून ते बैलगाडीसोबत ३00 ते ४00 फुट अंतरापर्यंत फरफटत जावून अपघात घडला होता. या बैलगाडी अपघातात विनायक गावंडे यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडिल, दोन मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: The death of the farmer in a bullock cart