विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 01:45 IST2016-10-08T01:45:14+5:302016-10-08T01:45:14+5:30
खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील घटना.

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
खामगाव (जि. बुलडाणा), दि. ८- विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शहरानजीकच्या टेंभूर्णा येथे शुक्रवारी सकाळी घडली. टेंभूर्णा येथील गणेश रामभाऊ चंदनशीव (वय ३५) यांच्या घरासमोर असलेल्या वीज खांबाच्या ताणामध्ये वीजप्रवाह होता. दरम्यान, गणेश चंदनशीव यांनी वीज खांबाच्या ताणाला स्पर्श केला असता, त्यांना विजेचा धक्का बसला. यामुळे त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. मृताच्या पश्चात पत्नी, मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेची चौकशी होऊन मृताच्या कुटुंबीयाला मदत व्हावी, अशी मागणी केल्या जात आहे.