वेळेवर उपचार न मिळाल्याने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: March 25, 2017 01:40 IST2017-03-25T01:39:34+5:302017-03-25T01:40:20+5:30

राज्यभरात सुरु असलेल्या डॉक्टरांच्या संपाचा फटका.

Death due to non-medical treatment | वेळेवर उपचार न मिळाल्याने इसमाचा मृत्यू

वेळेवर उपचार न मिळाल्याने इसमाचा मृत्यू

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. २४-: राज्यभरात सुरु असलेल्या डॉक्टरांच्या संपाचा फटका येथील हृदयविकाराचा झटका आलेल्या इसमास बसला असून केवळ उपचार वेळवर न मिळाल्यामुळे त्यास जिवीतास मुकावे लागल्याची घटना गुरुवारी घडली.
मलकापूर येथील निशीकांत मनोहर देशमुख (५९) यांना २३ मार्च रोजी दुपारी २.३0 वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना घेऊन घरच्या मंडळीने तात्काळ उपचारार्थ रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र येथील बहुतेक डॉक्टर संपांवर असल्याने त्यांना योग्य तो उपचार मिळालाच नाही. तथापि एका डॉक्टरने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथेदेखील उपचार न मिळाल्याने त्यांनस पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र या धावपळीत त्यांची तब्यंत गंभीर झाली. अखेर त्यांना उपचारार्थ बुलडाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.

Web Title: Death due to non-medical treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.