उपजिल्हा रुग्णालयातुन पडल्याने इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: July 12, 2014 22:20 IST2014-07-12T22:20:14+5:302014-07-12T22:20:14+5:30
सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या इसम रुग्णालयाच्या पहील्या माळ्यावरुन पडल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

उपजिल्हा रुग्णालयातुन पडल्याने इसमाचा मृत्यू
शेगाव: येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दयाराम बारीकराव शेगोकार, वय ५0 रा. मिलींद नगर शेगाव हा इसम रुग्णालयाच्या पहील्या माळ्यावरुन पडल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शेगाव पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे.
९ जुलै पासुन टि.बी. आजाराने ग्रस्त असलेले दयाराम शेगोकार हे रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयाती पहील्या माळ्या वरील पुरुष वार्डात औषधोपचार सुरु असतांना सकाळी रुग्णालयाच्या पोर्च मधुन खाली पडल्याने मृत्यु झाल्याचे दिसुन आले. या प्रकरणी शेगाव पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.