महादेवाच्या दर्शनासाठी महागिरी पर्वतावर जाताना भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:32 IST2018-08-27T18:31:42+5:302018-08-27T18:32:26+5:30

महादेवाच्या दर्शनासाठी महागिरी पर्वतावर जाताना भाविकाचा मृत्यू
संग्रामपूर : अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव महागिरी पर्वतावर चढतांना वाटेतच भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅगस्टरोजी दुपारी १ वाजता घडली.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा कि. मी. अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात मांगेरी महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी भक्त मोठ्या संख्येने जात असतात. टुनकी येथील दिनकर पुंडलिक महाल्ले (वय ५५) हे दुपारी १ वाजताच्या सुमारास दर्शनासाठी शेंबा व मांगेरी महादेवाचा पर्वत चढत असतांना त्यांना चक्कर आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयानी धाव घेतली. सोनाळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवटबकाल येथील रुग्णालयात रवाना केला. (तालुका प्रतिनिधी)