लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील जाेहरनगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन शेख शोहेब शेख कलीम याचा ५ ऑगस्ट २०२० राेजी शासकीय अध्यापक विद्यालयात सफाईचे काम करीत असताना विजेचा धक्याने मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाचा तपास करून पाेलिसांनी ४ ऑगस्ट राेजी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाेहरनगर भागातील शेख शोहेब शेख कलीम हा ५ ऑगस्ट २०२० राेजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफसफाईचे काम करीत हाेता. यावेळी त्याला शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा बुलडाणा शहर पाेलिसांनी तपास करून ४ ऑगस्ट रोजी पोहेकाँ माधव पेटकर यांच्या फिर्यादीवरून बालकामगार ठेवणे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा सुरेश लिंगायत, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मुरलीधर ढगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बालकामगाराचा मृत्यू; प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:05 IST