शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दोघा भावांचा एकाच दिवशी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : एकाच कुटुंबातील तिघा भावांपैकी एकाचा सकाळी तर  दुसर्‍याचा संध्याकाळी मृत्यू झाला. तर तिसरा मृत्यूशी झुंज देत  आहे. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर  कोसळल्याची घटना मलकापूर येथील सालीपुर्‍यात शुक्रवार, १७  रोजी घडली. वयाची पन्नाशीदेखील गाठली नसताना तीन पैकी  दोघांना सरणावर जाताना व तिसर्‍याला मृत्युशी झुंज देताना  बघण्याचा ...

ठळक मुद्देतिसर्‍याचीही मृत्यूशी झुंज पाटील दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : एकाच कुटुंबातील तिघा भावांपैकी एकाचा सकाळी तर  दुसर्‍याचा संध्याकाळी मृत्यू झाला. तर तिसरा मृत्यूशी झुंज देत  आहे. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर  कोसळल्याची घटना मलकापूर येथील सालीपुर्‍यात शुक्रवार, १७  रोजी घडली. वयाची पन्नाशीदेखील गाठली नसताना तीन पैकी  दोघांना सरणावर जाताना व तिसर्‍याला मृत्युशी झुंज देताना  बघण्याचा दुर्दैवी प्रसंग सालीपुर्‍यातील भिकाजी गणपत पाटील  (वय ४६) यांच्यावर ओढवला आहे. मलकापूर येथील सालीपुरा भागातील रहिवाशी भिकाजी पाटील  यांना राहुल (वय १८), अक्षय (वय १५) आणि गणेश (वय  १३) अशी तीन मुले होती. मोलमजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह  करणार्‍या पाटील यांच्या  तीनही मुलांना दिव्यांगत्व हे जन्मत:च हो ते. तरी देखील वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ही तिन्ही भावंडे शाळेत  शिकायला गेली. चांगल्या पद्धतीने शिकलीही, असे शेजारी सांग तात.मात्र सातव्या वर्षानंतर मोठा मुलगा राहुलने पाय टाकले. त्याला  चालता येईना. तेव्हा हलाखीची परिस्थिती असताना भिका पाटील  यांनी त्याला मुंबईपर्यंत नेवून त्याच्यावर उपचार केले; पण उपयोग  झाला नाही. दुसरा मुलगा अक्षय व लहान मुलगा गणेश यांच्यावरही  तशीच पाळी आली. दरम्यान लहान मुलगा गणेश याची प्रकृती बिघडल्याने त्याला १६  ऑगस्ट रोजी अकोला येथे भरती करण्यात आले.शुक्रवारी अकोल्यातच गणेशची प्राणज्योत मालविली. त्याच्यावर  १७ ऑगस्टला दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भिका पाटील यांचा  मोठा मुलगा राहुल याचीही प्राणज्योत मालविली. त्याच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा पद्धतीने एकाच  दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने येथील सालीपुर्‍यात शोककळा  पसरली, तिसरा मुलगा अक्षयदेखील गंभीर आजारी आहे. भिकाजी पाटील यांची परिस्थिती जेमतेम असल्याने प्रहार संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नीलेश ठोकळ यांच्या नेतृत्वात सोपान पाटील, गोविंद  गिरी, संतोष पाटील, श्याम राऊत आदींनी पाटील कुटुंबीयांना मदत  केली.