विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:45 IST2017-08-26T00:44:33+5:302017-08-26T00:45:02+5:30
लाखनवाडा: लोखंडी दरवाजामध्ये विजेचा प्रवाह आल्याने ध क्का लागून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना लाखनवाडा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. छाया प्रकाश वाकोडे असे मृत बालिकेचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनवाडा: लोखंडी दरवाजामध्ये विजेचा प्रवाह आल्याने ध क्का लागून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना लाखनवाडा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. छाया प्रकाश वाकोडे असे मृत बालिकेचे नाव आहे.
छाया वाकोडे ही दुपारच्या वेळी घरात खेळत असताना तिचा ध क्का लोखंडी दरवाजास लागला. लोखंडी दरवाजामध्ये विद्युत प्रवाह आला असल्यामुळे तिला विजेचा धक्का बसून ती जागीच गतप्राण झाली. तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. लोखंडी दरवाजामध्ये विद्युत प्रवाह कसा आला, याचा शोध कुटुंबीयांकडून घेण्यात येत आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.