विद्युत धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: July 19, 2014 00:53 IST2014-07-19T00:30:51+5:302014-07-19T00:53:12+5:30

मोताळा तालुक्यातील कोर्‍हाळा बाजार येथील घटना

Death of a 14-year-old boy with electric shock | विद्युत धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

विद्युत धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोताळा : तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन अतंर्गत येणार्‍या कोर्‍हाळा बाजार येथील एका १४ वर्षीय मुलाचा ईलेक्ट्रीक शॉक लागून करूण अंत झाला. ही घटना १८ जुलै रोजी खांडवा शिवारातील शेतामध्ये दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. कोर्‍हाळा बाजार येथील सौरव भिकन गोराडे वय १४ हा मुलगा आपल्या मित्रां सोबत खांडवा शिवारातील वसंत सपकाळ यांच्या शेतामध्ये गेला होता. दरम्यान दुपारच्यावेळी विहीरीवरील विद्युत पेटीचा त्याला जबरदस्त शॉक लागला. या दुर्घटनेत सौरवचा जागीच मृत्यू झाला. या घटने ची माहिती मिळताच मृतक सौरव चे वडिल व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत धामणगाव बढे पोलिसांना सुचना दिली. धामणगाव बढे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Death of a 14-year-old boy with electric shock