मेटाडोर झाडावर आदळून एक ठार
By Admin | Updated: June 15, 2017 00:25 IST2017-06-15T00:25:19+5:302017-06-15T00:25:19+5:30
भालेगाव : मेहकर- जानेफळ महामार्गावर भालेगाव फाट्यावर रेती वाहतूक करणारा मेटाडोर उभ्या बाभळीच्या झाडावर आदळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मेटाडोर झाडावर आदळून एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भालेगाव : मेहकर- जानेफळ महामार्गावर भालेगाव फाट्यावर रेती वाहतूक करणारा मेटाडोर उभ्या बाभळीच्या झाडावर आदळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
यासंदर्भात मेहकर येथील गाडी मालक गफ्फार खान यांचे वाहन रेती वाहतूक करीत होती. मेहकर येथीलच माळीपेठमधील चालक कय्यूम खान, आरीफ शहा, तज्जीम कुरेशी हे गाडीवर कामगार होते. मेटाडोरच्या कॅबीनमध्ये असलेले ड्रायव्हर आणि क्लिनर हे बचावले; परंतु मेटडोरमध्ये पाठीमागे रेतीवर बसलेले इरफान कुरेशी (१९) हे जागीच ठार झाले. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.