शेतातील विहीरीत आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 13:32 IST2018-10-14T13:31:37+5:302018-10-14T13:32:51+5:30
संग्रामपुर : तालुक्यातील टुनकी खुर्द शिवारात रविवारी सकाळी 7:30 वाजता शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली.

शेतातील विहीरीत आढळला मृतदेह
संग्रामपुर : तालुक्यातील टुनकी खुर्द शिवारात रविवारी सकाळी 7:30 वाजता शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ उडाली.
टुनकी येथील डाँ शेख वहीद पटेल यांचे शेत टुनकी खुर्द शिवारात गट क्र. 20 मध्ये शेत आहे. ते सकाळी शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना शेतातील विहीरीतुन दुर्गंधी आली त्यांनी विहीरीत डोकाऊन पाहिले.
याबाबत त्यांनी टुनकी खुर्द येथील पोलिस पाटील साहेबराव भिसे, टुनकीचे तंटामुक्ती अध्यक्ष गजानन विनकर, सरपंच पती मुरलीधर चोरे, माजी सरपंच जिवन लोनकर, कैलास धाटे यांना धटनेची माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहनी केली असता. विहीतील पाण्यावर कुजलेल्या स्थितीत कुणीतरी तरंगत असल्याचे आढळले. याबाबत डॉ. पटेल यांनी सोनाळा पोलिस स्टेनशनला देण्यात आली आहे. सोनाळा पोलिस स्टेशनचे पि एस आय डि. बि. वाघमोळे श्याम कपले, गजानन तायडे, सचिन राठोड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अचानक विहीरीत मृतदेह आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.