जिजाऊ सृष्टीवर दशरात्रोत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:37+5:302021-01-04T04:28:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदखेडराजा : जिजाऊ जयंतीनिमित्ताने येथील जिजाऊ सृष्टीवर सावित्री जयंती ते जिजाऊ जयंती व १४ जानेवारीला असलेल्या ...

Dasharatrotsavas begin on Jijau creation | जिजाऊ सृष्टीवर दशरात्रोत्सवास सुरुवात

जिजाऊ सृष्टीवर दशरात्रोत्सवास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

सिंदखेडराजा : जिजाऊ जयंतीनिमित्ताने येथील जिजाऊ सृष्टीवर सावित्री जयंती ते जिजाऊ जयंती व १४ जानेवारीला असलेल्या संत चोखामेळा जन्मदिनानिमित्त दशरात्रोत्सवास आज (रविवारी) सुरुवात झाली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करत या उत्सवातील सर्व कार्यक्रम अत्यंत साधेपणाने होणार आहेत.

रविवारी सकाळी नगराध्यक्ष सतीश तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, शिवाजीराजे जाधव, मराठा सेवा संघाचे डॉ. मनोहर तुपकर, रवींद्र चेके, संजय विखे, विवेक काळे, योगेश पाटील, पुरुषोत्तम जाधव, संदीप निर्मळ, पंकज देशमुख, रामेश्वर वायाळ, रमेश ढगे, श्रीकृष्ण इंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ज्योती जाधव, अर्चना ठोसरे, शीतल तनपुरे, आशा देशमुख, उर्मिला हाडे, अर्चना तायडे, स्नेहा झाल्टे, विद्याताई देशमुख, ज्योती खांडेभराड उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अॅड राजेंद्र ठोसरे यांनी केले.

Web Title: Dasharatrotsavas begin on Jijau creation