Dasara 2018 : शेगावात रा. स्व.संघाचे शानदार पथसंचलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 11:24 AM2018-10-18T11:24:04+5:302018-10-18T11:25:48+5:30

Dasara 2018 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने विजयादशमीच्या पर्वावर सकाळी 8 वाजता शहरातून शानदार पथसंचलन निघाले.

Dasara 2018 : RSS Vijayadashami Utsav rally in shegaon | Dasara 2018 : शेगावात रा. स्व.संघाचे शानदार पथसंचलन

Dasara 2018 : शेगावात रा. स्व.संघाचे शानदार पथसंचलन

Next

- अनिल उंबरकार
शेगाव  - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने विजयादशमीच्या पर्वावर सकाळी 8 वाजता शहरातून शानदार पथसंचलन निघाले. या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांमध्ये उत्साह दिसून आला. मंदिर परिसराजवळ तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. येथील श्रीराम नगरातील नगर परिषद स्वामी विवेकानंद ज्ञानपिठचे प्रांगणावर 18 ऑक्टोबरला सकाळी 7वाजता  संघ स्वयंसेवक एकत्र येवून संघाच्या गणवेषात काठीसह पथसंचलनात सहभागी झाले होते. 

सकाळी 8 वाजल्यापासून घोष पथकासह पथसंचलनास प्रारंभ झाला. बसस्थानक समोरून अग्रसेन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री गजानन महाराज देवस्थानजवळून, सितला माता मंदिर, फरशी  मस्जीद,  गढी समोरून भैरव चौक, आठवडी बाजार मार्गे श्रीराम नगरमधील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठचे प्रांगणावर पथसंचलनाचा समारोप झाला. तालुका संघचालक श्रीराम पुंडे,  नगर संघचालक शाम तेल्हारकर यांचेसह शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Web Title: Dasara 2018 : RSS Vijayadashami Utsav rally in shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.