डोमरूळ येथे डेंग्यूसदृश ताप असलेला रुग्ण आढळला!
By Admin | Updated: September 20, 2016 00:27 IST2016-09-20T00:27:12+5:302016-09-20T00:27:12+5:30
सातगाव, धामणगावात तापाची साथ.
_ns.jpg)
डोमरूळ येथे डेंग्यूसदृश ताप असलेला रुग्ण आढळला!
डोमरूळ (जि. बुलडाणा), दि. १९: डोमरूळ येथील समाधान जाधव या मुलाची प्रकृती अत्यवस्थ झाली असून, त्याला डेंग्यूसदृश ताप झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
येथील माजी उपसरपंच सागर जाधव यांचा मुलगा समाधान याला १४ सप्टेंबर रोजी अस्वस्थ वाटत असल्यामुळे धाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, तसेच साक्राबाई महाले, अनिता काकफळे या थंडी-तापाने ग्रस्त आहेत. तालुक्यातील जामठी, डोमरूळ, टाकळी, सातगाव म्ह., धामणगाव, कुलमखेड, पांगरी उबरहंडे यांसारख्या अनेक गावात धूळफवारणी नाही. त्यामुळे डासांचा उद्रेक वाढला आहे. गटार सफाई, नाले सफाई, तणनाशक फवारणी, पाणी तपासणी गावातील मोकळ्या जागेवरील घाण, सांडपाणी विल्हेवाट सदोष असल्यामुळे अनेक ठिकाणी जनतेला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. डोमरूळ येथील जुने गाव आणि नवीन वस्ती यांच्यादरम्यान वाहत असलेल्या नाल्याची साफसफाई नियमित होत नाही. जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे.