निवडणुकीच्या नावाखाली ‘दांडी’
By Admin | Updated: October 10, 2014 00:11 IST2014-10-10T00:11:28+5:302014-10-10T00:11:28+5:30
निवडणुकीची सबब आणि बुलडाणा येथील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट.

निवडणुकीच्या नावाखाली ‘दांडी’
बुलडाणा : सारे इलेक्शनच्या कामात आहेत, कोणी भेटणार नाही, उद्या या, असे उत्तर आज विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम घेऊन आलेल्या लोकांना मिळत होते. कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते, तर पदाधिकारी नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी गेले होते. काही अधिकारी व कर्मचारी सकाळी कार्यालयात आले. त्यानंतर कोणीच फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
ह्यलोकमतह्णने आज शहरातील शासकीय कार्यालयांची झाडाझडती घेतली असता, प्रामुख्याने ही स्थिती दिसून आली. निवडणुकीच्या कामकाजाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ह्यइलेक्शन ड्युटीह्णच्या नावाखाली अनेक कर्मचारी कामचुकारपणा करीत असून, निवडणुकीचा बागुलबुवा करून कर्मचारी सर्वसामान्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा माहौल असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांची कामे असतात. मात्र, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या नावाखाली दांडी मारताना दिसत आहेत.
* जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती
निवडणुकीचे जिल्हास्तरीय सर्व कामकाज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे. येथील निवडणूक विभागासह इतर सर्व विभागांतील कर्मचारी निवडणूक कामासाठी धावपळ करताना आढळून आले. मात्र, महत्त्वाच्या विभागात केवळ अधिकारी मंडळी उपस्थित होती. इतर कर्मचार्यांच्या खुच्र्या रिकाम्या होता, तर परिसरात नेहमीसारखा नागरिकांचा वावर नव्हता.
झेडपीत शुकशुकाट
जिल्हा परिषदेमध्ये आज अनेक विभागांमध्ये शुकशुकाट होता. एरवी जिल्ह्यातील राजकीय गणितांची जुळवाजुळव आणि विकासकामाच्या चर्चा व अंमलबजावणीचे काम प्रत्येक टेबलावर होत असते. मात्र, येथील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे विविध विभागांत शुकशुकाट पसरला होता. एका विभागात दोन-तीन कर्मचारी टेबलावर दिसून आले. शिक्षण विभागाला भेट दिली असता, एकही कर्मचारी नव्हता.
*तहसील कार्यालयावर कामाचा व्याप
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थानिक तहसील कार्यालयातून राबविली जात आहे. यासाठी कार्यालयातील ३३ कर्मचार्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज येथे जवळपास सर्व कर्मचारी उपस्थित होते; मात्र कार्यालयात पुरवठा, नक्कल विभाग आणि सेतू कार्यालयातील काही टेबल रिकामे असल्यामुळे विविध कामांसाठी येणार्या नागरिकांची गैरसोय झाली. त्याचा आर्थिक फटकाही त्यांना बसला.
* पंचायत समितीचे टेबल रिकाम
येथील ४0 टक्के कर्मचार्यांच्या निवडणुकीसाठी ड्युट्या लागल्या आहेत, तर इतर कर्मचारी दुपारी जेवणाच्या निमित्ताने गेले, ते आले नाहीत, अशी माहिती पंचायत समितीत उपस्थित एका चतुर्थश्रेणी कर्मचार्याने सांगितले. शिवाय नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी गेल्यामुळे सर्व सभापतींचा कक्षही रिकामा होता. त्यामुळे पंचायत समितीच्या विविध विभागांत शुकशुकाट दिसून आला.