नाचण्याच्या वादातून लग्नात हाणामारी

By Admin | Updated: November 28, 2015 02:38 IST2015-11-28T02:38:05+5:302015-11-28T02:38:05+5:30

मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील घटना; ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

Dancing In Action | नाचण्याच्या वादातून लग्नात हाणामारी

नाचण्याच्या वादातून लग्नात हाणामारी

मोताळा (जि. बुलडाणा) : बोराखेडी येथे एका लग्न सोहळय़ामध्ये नाचण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनुसार बोराखेडी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये लग्न सोहळय़ादरम्यान नाचण्याच्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला. लग्नात नाचत असताना काही मंडळींनी दारूचे सेवन केले असल्याने वादाची ठिणगी उडाली आणि आपापसात झोंबाझोंबी करीत एकमेकाविरुद्ध लाठय़ाकाठय़ांनी हाणामारी सुरू झाली. लग्न वर्‍हाड व पाहुणे मंडळींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.; मात्र भांडण विकोपाला जावून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. प्रकरणी पोलिसांनी गुलाब भिका एकनर, वच्छला आत्माराम वाघ, सुनील एकनर, शरद साहेबराव एकनर, रंजना बाळू भंवर, धनराम काशीराम शिंदे, एकनाथ शिंदे, मानिक शिंदे, भावसिंग शिंदे, सुरजा शिंदे सर्व रा. बोराखेडी व कला सीताराम शिंदे रा. मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्याविरुद्ध कलम १0७, ३२४, ३२३, ५0४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Dancing In Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.