दोन चिडीमारांसह महिलेवर दामिनी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:05 IST2017-08-01T00:03:28+5:302017-08-01T00:05:55+5:30

जिल्हा महिला दक्षता पथकाने (दामिनी पथक) ३१ जुलै रोजी शहरात धडक कारवाई करीत दोन चिडीमारांसह एक महिला व वाहन ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओंना चाप बसला आहे.

Damini Squad Action on Women With Two Poodlers | दोन चिडीमारांसह महिलेवर दामिनी पथकाची कारवाई

दोन चिडीमारांसह महिलेवर दामिनी पथकाची कारवाई

ठळक मुद्देरोडरोमिओंच्या संख्येत प्रचंड वाढ कारवाईने रोडरोमिओंना बसला चाप साध्या वेशात टेहळणी करून गस्त घातली

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : सध्या शहरातील महाविद्यालये, धार्मिक स्थळे, प्रमुख बाजारपेठ आदी भागात युवती व महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच महाविद्यालयीन युवावर्गामध्ये शिक्षणाऐवजी दुसरेच उद्योग सुरू आहेत. तसेच रोडरोमिओंच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला दक्षता पथकाने (दामिनी पथक) ३१ जुलै रोजी शहरात धडक कारवाई करीत दोन चिडीमारांसह एक महिला व वाहन ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओंना चाप बसला आहे.
महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. या पथकांकडून सार्वजनिक ठिकाणे आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबतच रोडरोमिओंवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. ‘दामिनी पोलीस पथक’ असे या पथकाचे नाव आहे. या पथकातील पाच महिला पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै रोजी शहरातील आठवडी बाजाराचा दिवस तसेच श्रावण सोमवार पाहता शहरातील महाविद्यालये, धार्मिक स्थळे, बसस्थानक व आठवडी बाजार आदी परिसरात महिला व मुलींची छेडझाड होणाºया ठिकाणांवर साध्या वेशात टेहळणी करून गस्त घातली. यादरम्यान स्थानिक श्री शिवाजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या गणपती मंदिराजवळ चिडीमारी करणाºया सुरेश परशराम तुपकर (वय ४०) रा.साखरखेर्डा, व त्याचे वाहन इंडिका व्हिस्टा क्र.एम.एच. २८-व्ही ६५९८ सह अतुल भीमराव जाधव (वय २२) व सावरगाव डुकरे येथील एका महिलेला ताब्यात घेऊन कलम ११०, १७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती दामिनी पथकाच्या प्रमुख लीला इंगळे यांनी दिली. या दामिनी स्कॉडमध्ये बुलडाणा पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलीस लीला इंगळे, मनापोकॉ संगीता सोरमारे, रेखा डोंगरदिवे, मपोकॉ रेखा मात्रे, अंजली जाधव व वाहन चालक सैय्यद नसीम यांचा समावेश आहे.

चिखलीत प्रथमच झाली कारवाई
दामिनी पथकाच्या स्थापनेनंतर शहरात प्रथमच ही कारवाई झाली असून, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याने रोडरोमिओंना चांगलाच चाप बसला आहे. अशा कारवार्इंमुळे महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, कुठेही छेडछाडीची घटना होत असेल, तर विद्यार्थिनींनी व महिलांनी निसंकोचपणे आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Damini Squad Action on Women With Two Poodlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.