अनियमित वीजपुरवठ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:14 IST2021-04-07T11:14:16+5:302021-04-07T11:14:24+5:30
Irregular power supply कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

अनियमित वीजपुरवठ्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अनियमित वीजपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देण्याकरीता कृषीपंपासाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गजानन बोंबटकार, योगेश म्हसाळ यांनी गुरूवारी महावितरणकडे केली आहे.
अनियमित वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. नोकरी मिळणे कठीण झाल्याने व कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. त्यांनी आधुनिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. एकदाच संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीने न काही क्षेत्रावर प्रायोगित तत्त्वार करण्यात येत आहे. यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्याचा मानस आहे. परंतु या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना महावितरणच्या वतीने एक दिवसाआड दिवसभर भारनियमन सुरू आहे. परिणामी शेतकºयांना पिकांना पाणी देताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांनंतर उन्हाळी पिकांचीही लागवड केली आहे. कांदा यासह भेंडी, काकडी, मेथी, कोथंबीर, मुळा, पालेभाज्या, टॉमेटो आदी पिकांची लागवड केली आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी न गेल्यास पिके सुकण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे कृषीपंपासाठी दिवसभर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.