वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 07:49 PM2017-09-14T19:49:46+5:302017-09-14T19:50:59+5:30

वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. 

Damage of sugarcane crop by storm wind and rain | वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

Next
ठळक मुद्देहिवरा आश्रम परिसररात वादळीवा-यासह पाऊसशेतक-यांचे नुकसानपंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. 
मेहकर तालुक्यात मंगळवारी व बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत जोराचा वारा वाहत होता. या वाºयामुळे व पावसामुळे लव्हाळा, गजरखेड, पेनटाकळी परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व ऊस पीक हे मुळासकट आडवे पडले आहे. त्यामुळे हा ऊस पुन्हा उभा राहण्याची शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अगोदरच पाऊस वेळेवर नसल्याने व सोयाबीन पिकांना बºयाच ठिकाणी शेंगा लागल्या नसल्याने त्यात ऊस पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. यामध्ये लव्हाळा येथील श्रीकृष्ण लहाने यांचा १ हेक्टर ऊस, गजरखेड शिवारातील अमोल अशोक गायकवाड ०.४० हे, अशोक भिमराव गायकवाड ०.८० हे, भगवान संतोष लाकडे ०.८० हे, मंगेश ज्ञानेश्वर लाकडे ०.६० हे, निलेश अशोक लाकडे ०.६० हे., तर पेनटाकळी शिवारातील जगाराव साहेबराव दळवी १.०० हे, रंगराव साहेबराव दळवी १ हे., केशव साहेबराव दळवी १.४० हे, श्रीराम देवराव धोंडगे ०.८० हे. 
एवढ्या क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात कमी  जास्त प्रमाणात पाऊस झाला असून काही नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या मुग, उडीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. 

Web Title: Damage of sugarcane crop by storm wind and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.